Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाल्यानंतर धाडकन लोकं स्टेजवर आली मारण्यासाठी. मी अशी बसलेली. पर्स खांद्यावर होती. चप्पल काढून ठेवलेली. थोड्या वेळात काही कळेनासं झालं. पण तेवढ्या वेळामध्ये दोन-तीन माणसं मागून आली. त्यांनी असं मला उचललं नि धावले मला घेऊन. मला काहीच कळेना. ते म्हणाले, 'बाईजी आप घबराओ मत. अल्ला आपके साथ है, आप बहुत अच्छा काम कर रही है.' ते मुसलमान असतील असं वाटलं. त्यांनी मला एका बाजूला लपवलं. पोलीस आले. नंतर सगळं शांत झालं. आम्ही जाऊन स्टेजवर बसलो. मग लोक बोलायला लागले. 'नही नही, आप बोलिए. हम सुनना चाहते है आपको. आप लोग क्यूं आए है यहाँ पे.' अशा रीतीने आमचा प्रोग्रॅम झाला तिथं. दंगलीची पहिली वेळ होती ती. नंतर आम्ही नगरला गेलो. मधला मालेगावचा प्रोग्रॅम कॅन्सल झाला. बंदी घातली होती. सकाळी सातला निघालो. आमची गाडी अशी जातेय. पुढे दोन-तीन गाड्या, बाजूला दोनतीन गाड्या, मागे पोलिसांच्या. म्हणजे प्राईम मिनिस्टरला सुद्धा प्रोटेक्शन नव्हतं इतकं गव्हर्मेटने आम्हांला प्रोटेक्शन दिलेलं होतं. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. पोलीस ऑफिसर पण इतके चांगले दिले होते की सगळे रिस्पेक्ट देऊन माझ्याशी बोलत होते. आमचा सल्ला घेऊनच पुढे जात होते. कुठेही आमच्या लोकांना त्रास झाला नाही. आरामात आम्ही प्रवास करू शकलो. नगरला जेव्हा पोचलो तेव्हा आत जातानाच दगडफेक खूप झाली. पोलिसांनी सांगितलं का इथं बुरखेवाल्या बायका आहेत, तुमची फजिती करणार आहेत. मोर्चा काढून नेलात की ते तुम्हांला पकडणार आहेत. तर तुम्ही ठरवा मोर्चा काढायचा का नाही. आमच्या बरोबरची जी लोकं होती ती पण असं म्हणायला लागली की भाभी, आता निर्णय तुम्ही घ्यायचाय. आम्ही खूप दमलोय. आम्हांला आता पुढं यायचं नाहीये. इथं धोका दिसतोय. इथपर्यंत आपण बरोबर आलो. एकच शेवटचा टप्पा आहे नाशिकचा. तो आपण गाठूू असं काही नाहीये. इथून आपण आता परत जायला पाहिजे. हा निर्णय घ्यायलाच पाहिजे. हुसेन जमादार वगैरे म्हणायला लागले, 'आम्ही दगड खाऊ, काय हरकत आहे?' मी म्हटलं, 'हे बोलणं सोपं असतं. मी खाईन, तू खाशील. एवढी लोकं आली आहेत आपल्याबरोबर. यांनी एक दगड खाल्ला तर परत येणार नाहीत आपल्याबरोबर. यांच्या सेफ्टीसाठी आपल्याला विचार करावा लागेल.' आणि असं करून आम्ही ऑफिसरना सांगितलं की आम्ही इथला प्रोग्रॅम रद्द करतो.

 तिथून गाडी निघाली. जेवणसुद्धा नाही घेतलं. गाडीत त्यांना भरलं. मला

मी भरून पावले आहे : १८१