अण्णांनासुद्धा आश्चर्य वाटलं. माझं बोलणं संपल्यानंतर त्यांनी हात पुढे केला. आणि तो पेपर मागितला. मी हसले आणि त्यांना सांगितले. तुम्हांला ते कळणार नाही. उर्दू बघून काही उपयोग नाही. अण्णा म्हणाले, मी हैदराबादला होतो. मला उर्दू भाषा चांगली येते. मी त्यांना ते पेपर दिले. पण त्यांना काही कळलं नाही. मग त्यांनी मला विचारलं हा काय प्रकार आहे? त्यावर मी म्हणाले मराठी भाषा उर्दू लिपीमध्ये आहे. ते हसले. आणि त्यांनी माझं कौतुक केलं. हा पुरस्कार एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र असा होता.
.
७८ मध्ये अमरावतीला कॉन्फरन्स झाली मोठी. वजीर पटेलनी घेतली होती, कुलसुम पारेख आलेल्या होत्या. तिथं आम्हीही गेलेलो होतो. तेव्हा काही महंमददांनी लिहून दिलेलं नव्हतं आणि तिथं हिंदीमध्येच बोलायचं होतं. त्यामुळं माझं भाषण मी स्वतः उर्दूमध्ये पूर्ण लिहिलेलं होतं. मला मुद्दे माहिती होते. त्यावर मी भाषण केलं. बरं होतं. मला असं वाटत नाही का आपल्याला अजिबात बोलता येत नाही, पण ते लिहिलेलं मला वाचता आलं. त्यानंतर त्यांनी २-३ ठिकाणी आम्हांला नेलं. तर मी तिथं बोलू शकले नाही. मुमताज रहिमतपुरे होती. जनार्दन वाघमारे होते. त्यांनी आमच्याबरोबर एक मीटिंग घेतली. तिथं मुमताज रहिमतपुरेनं भाषण केलं. भाषणाला दोघींना बोलावलं होतं. मी तिथं बोलले नाही. मला बोलायला येणार नाही म्हटलं इथं आणि तिनं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये एक असा मुद्दा मांडला होता की कुराण हे अस्मानी किताब नाहीये. कुठलंही पुस्तक अस्मानी कसं असू शकेल? ते काही वरून पडत नाही. त्याच्यावर खूप वाद झाला. मारामारी करण्यापर्यंत वेळ आली. आम्हांला दोघींना धरून मग गच्चीवर नेऊन एका खोलीमध्ये नेलं आणि तिथं आमची मीटिंग झाली. मी बोललेच नव्हते. तीच बोलली होती. मी घाबरले होते. मी. बोलले नव्हते तरी त्यांनी मला भाषणाचे पैसे देऊ केले. पण मी ते घेतले नाही. नुसतं चहापाणी घेऊन बाहेर पडलो तिथून. ती माझी पहिली मीटिंग. त्यामुळं कळलं लोक कसे दुखावले जातात. कुठला मुद्दा मांडायचा. हिस्टॉरिकल फॅक्ट्स बोलायचेच नाहीत, का तर त्यावर वाद होतो. असे अनुभव पुढेही मला आले.
१९७८ मध्ये अलिगढला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. त्या वेळी मी तिथं गेले होते. मी, महंमददा नि जमादार. तिघं असे ठरवून त्या दंगलीच्या काळामध्ये गेलो. पहिल्यांदा दिल्लीला गेलो. तिथं नगरकर होते. त्यांना विचारलं. ते म्हणाले, तुम्ही दंगलीच्या एरियात फिरा. काही बायका जमा करा, हिंदू मुसलमान सगळ्या. त्यांना थोडी मदत पण करा. त्यांनी काही पैसेही दिले होते माझ्याजवळ. रिसीट बुक
मी भरून पावले आहे : १६५