आज आयेषा, भाना आल्या होत्या ना? काय बोलत होत्या?' ते म्हणाले, 'काही नाही ग. मेहरू, त्या खूप रडत होत्या. त्या म्हणत होत्या, ‘दादा तुम्हांलाच आता बरं नाहीए. आमच्याकडे आता कोण बघणार? आमचं कोण करणार? कोणाला आम्ही दादा म्हणून हाक मारू? आणि दादा म्हणून मदत करायला आम्हांला कोण येणार? तर तुम्ही तुमची तब्येत सुधारा. आमचं सगळं आयुष्य आम्ही तुम्हांला द्यायला तयार आहोत. पण तुम्ही चांगले व्हा याच्यातनं.' आणि खूप रडल्या. अशा ढसाढसा रडत होत्या ग मला जवळ घेऊन. मला सुचेना काय बोलायचं ते. पण मेहरू, त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हं. त्यांचं कोणी नाहीये.' एवढ्या आजारपणात सुद्धा त्यांना माहिती होतं का मी बिनपगारी रजेवर आहे, पैशाची सोय नाही, तरी ते म्हणायचे, 'मेहरू पहिली तारीख झाली. आपल्या घरी पैसे गेले? पोरं उपाशी असणार.' त्या काळात सव्वाशे रुपये जायचे आमच्याकडून. मी ऑफिसमध्ये असताना पगाराच्या दिवशी मनीऑर्डर करायची नि घरी येऊन सांगायची मला पगार मिळाला, घरी बाबांना सव्वाशे रुपयांची मनीऑर्डर केली की हे खूष असायचे. त्यांना दुसरं काही नको असायचं. म्हणायचे, 'आपण कसं तरी चालवू या. पण तिकडं पोरं उपाशी असतील. एवढी लहान लहान पोरं. बाबा बिचारे काय करणार ग?' आणि आजारीपणात सुद्धा त्यांना असं वाटायचं, की आपले पैसे गेले पाहिजेत. म्हणायचे की, 'मेहरू, पैसे घे आणि तू पाठवून दे हं. नाही म्हणू नको.' चंदावरकरांकडे मुली असताना सहा महिने आम्ही पैसे पाठवलेच नव्हते. पैसेच नव्हते माझ्याकडे. मला पगार नव्हता. त्यामुळे काय करणार? चंदावरकर तीनदा येऊन गेले, पण काय करणार? त्यांनी सांगितलं की, तुम्ही काळजी करायची नाही, त्या मुली माझ्या आहेत. जे पैसे तुम्ही या मुलींना पाठवता ते पाठवू नका. ते दलवाईंच्या औषधांसाठी मी दिले असं समजा. पण मला ते बरोबर वाटायचं नाही. मग मी थोडे थोडे शंभर, दोनशे असे करून ते पैसे फेडले त्यांचे. सहा महिन्यांचे पैसे हळूहळू फेडले. माझी धाकटी मुलगी तिथं असायची. सुट्टीला ती नणंदेकडं यायची. नि मोठी कॉलेज-बिलेज सोडून आली होती. मी शिकणारच नाहीये म्हणायची. तू बाबांपासून आम्हांला मुद्दाम लांब ठेवते. बाबा आम्हांला नकोयेत का? आम्ही बाबांना सोडून मुळीच जाणार नाही. आम्ही तुझं ऐकणारच नाही, म्हणायची. बाबांना धरून राहायची. म्हणायची, 'बाबा, तुम्ही सांगा तिला. ममा अशीच करते.' रुबीना त्यांचं खूप करायची. दिवस-रात्र ध्यास घेऊन सेवा करायची. हे गेल्यानंतर तिला फिटस् यायला लागल्या. अशी उभ्या
मी भरून पावले आहे : ११९