अशी चूक मी कधी करणार नाही. मला खूप त्रास झाला ग म्हणून माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही." मग हे काम तर मी करायचीच, नर्सला न सांगता. त्यांना जरा ऑकवर्ड वाटायचं. म्हणून मीच करायची किंवा मग महंमददा यायचे. नेहमी ऑफिसमधून यायचे. ते म्हणायचे, हे हमीदचं काम ही माझी ड्यूटी. आणि रात्री परत जाईपर्यंत तेच सगळं करायचे. मला काही करावं लागायचं नाही. तेच सगळं बघून घ्यायचे. रात्री येणाऱ्यांपैकी अमीर होता. हे सगळे दलवाईच. मग कादीर एक होता त्यांच्या नात्यापैकीच. मुकादम होते. अशी सगळी माणसं येत होती. रोजची झोपायला यायची. सगळे जे नातेवाईक होते त्यांचे गावामधले, ते सगळे पाळीपाळीने बघून जायचे. खाण्यापिण्यासाठी आणायचे. पैशाबद्दल त्यांना विचारायचे. कुणीही असं दाखवलं नाही, का बरं झालं, याला हे झालं. सगळ्यांना असं वाटत होतं का हमीदखानला हे काय झालेलं आहे? त्याला लवकर बरं वाटलं तर बरं होईल. रोज येणारी अशी माणसं होती. त्यात पाटणकर म्हणून एकजण होते यांचे मित्र. आर.टी.ओ.मध्ये होते. ते एका दिवसाआड रेग्युलर यायचे. नेहमी यायचे. विचारपूस करायचे. मुंबईतच राहायला होते. आधीचीच ओळख होती. आम्ही गाडी घेतलेली होती. हे काय शिकलेले नव्हते ना गाडी. त्यामुळे आर.टी.ओ.ला दाखवायला सर्टिफिकेट, लायसेन्स मिळवायचं हे सगळं त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांची खूप मैत्री. घरी-बिरी जायचं, जेवण-बिवण करायचं. खूप चांगली मैत्री. ते नेहमी यायचे. एक दिवस ते आले. त्या दिवशी दलवाईंचा मूड खराब होता. कशावरून तरी रागात त्यांनी फटकन मला एक शिवी दिली. मी अशी पलंगावर बसलेली. खरं तर कधीही यांच्या तोंडात शिवी नव्हती. फटकन शिवी दिल्यानंतर पाटणकर समोर बसलेले असल्यानं मी एकदम खालीच मान घातली. तेव्हा पाटणकर झटकन उठले आणि म्हणाले, 'हमीद, तुझ्या तोंडून असले शब्द ऐकायला नकोत. हे जर तू बोलणार असशील भाभीबद्दल तर मी तुझं तोंडसुद्धा बघायला येणार नाही.' दलवाईंनी लगेच त्यांचा हात धरला. ते गेल्यानंतर मला म्हणाले, 'मेहरू, मला क्षमा कर. मी कुठल्या मूडमध्ये होतो आणि का माझ्या तोंडातून असं निघालं, मला माहिती नाही. तू मला आता समजून घे. का तर, मी लोकांच्यासमोर काही न बोलता राहातो. मला खूप त्रास होतो, पण मी कुणाला दाखवत नाही, येणारी लोकं नर्व्हस होऊ नयेत म्हणून. मी किती सीरियस आहे, याची जाणीव मी त्यांना मुद्दाम करून देत नाही. पण तुझ्यासमोर मी तसा राहू शकत नाही. कोणी तरी माझं माणूस आहे. तुला बोललं का मला बरं वाटतं. म्हणून जो काय त्रास द्यायला जातो तो तुलाच. म्हणजे तुला
पान:मी भरून पावले आहे.pdf/121
Appearance