पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

बिंदुमाधव खिरे , बिंदुमाधव खिरे हे पेशानी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दहा वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर २००० साली त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. २००२ साली त्यांनी 'समपथिक ट्रस्ट, पुणे या संस्थेची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे 'पुरुष लैंगिक आरोग्य केंद्र' चालवलं जातं. बिंदुमाधव खिरे यांची 'पार्टनर', 'इंद्रधनु', 'लैंगिक शिक्षण व लैंगिकता हेल्पलाईन मार्गदर्शिका' ही तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. 'मानवी लैंगिकता' हे पुस्तक त्यांच्या अनुभवांतून व अभ्यासातून साकारलं आहे. लैंगिकतेबद्दल फारसं खुलेपणानं बोलण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्यामुळे चोरून-लपून मिळतील ती वाचलेली पुस्तकं व अलीकडच्या काळातील इंटरनेट यांतून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे या विषयाबाबत प्रचंड गैरसमज व अंधश्रद्धा आढळून येतात.

  • जननेंद्रियं व त्यांचं कार्य, जननेंद्रियांतील वेगळेपण

गर्भधारणा, प्रसूती, वंध्यत्व, पर्यावरण व प्रजनन आरोग्य

  • लैंगिक समस्या
  • अश्लील वाङ्मय/लैंगिक सुखाच्या जाहिरातींतून पसरणारे

गैरसमज

  • विकलांगता व लैंगिक आरोग्य
  • लैंगिक अत्याचार
  • समलैंगिकता
  • लिंगभाव, लिंगबदल शस्त्रक्रिया

आजार, औषधं, दारू/नशा व लैंगिक आरोग्य

  • हिजडा समाज
  • स्त्री व पुरुष वेश्याव्यवसाय

या विषयांतल्या अनेक शंका, मनातले गोंधळ दूर करणारी शास्त्रशुद्ध प्राथमिक माहिती या पुस्तकात दिली आहे.