पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

इतकाच असतो की आता त्या वीर्यामध्ये पुरुषबीजं. नसतात. या शस्त्रक्रियेनंतर आठवड्यात पुरुष ताकदीची/वजन उचलायची कामं करू शकतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीच्या काही संभोगात वीर्यपतनाच्या वेळी वीर्यात पुरुषबीजं असू शकतात. हा कालावधी अंदाजे ६ महिने किंवा १०० वीर्यपतनं असा मोजला जातो. म्हणून पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेनंतर ३ व ६ महिन्यांनी डॉक्टर वीर्याची चाचणी करून वीर्यात पुरुषबीजं आहेत का, याची तपासणी करतात. वीर्यात पुरुषबीजं नाहीत याची खात्री होईपर्यंत गर्भधारणा होऊ नये म्हणून संभोगाच्या वेळी इतर गर्भनिरोधक साधन वापरावं. स्त्री नसबंदी पुरुष नसबंदीच्या तुलनेत स्त्री नसबंदीची शस्त्रक्रिया जास्त अवघड आहे. यात भूल देऊन स्त्रीचं पोट बेंबीजवळ उघडून स्त्रीबीजवाहिन्यांना छेद देऊन नळ्यांची टोकं बंद करावी लागतात. या शस्त्रक्रियेची जखम भरून यायला पुरुष नसबंदीच्या तुलनेत जास्त वेळ लागतो. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर १ महिना गर्भधारणा होऊ नये म्हणून इतर गर्भनिरोधक साधनाचा वापर करणं गरजेचं असतं. तुलनात्मक त्रास बघता स्त्रियांना नसबंदीचा आग्रह न धरता, पुरुषांनी नसबंदी करण्याचा पुरुषार्थ दाखवणं गरजेचं आहे. नसबंदी उलटी करणं (रिव्हर्सल ऑफ व्हॅसेक्टोमी, ट्युबेक्टोमी) नसबंदी उलटी करण्याची शस्त्रक्रिया करता येते पण ही शस्त्रक्रिया जास्त अवघड व जास्त खर्चिक असते. अशा शस्त्रक्रियेला यश येईल की नाही हे सांगता येत नाही. अयशस्वी नसबंदी आपण काही वेळा वर्तमानपत्रात वाचतो, की नसबंदी करूनही काही वर्षांनी मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २०९ $