पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

असेल व योनीमैथुन झाल्यावर पुरुषबीजाने स्त्रीबीजाला फलित केलं, तर ही गोळी गर्भाशयाचं विशिष्ट पेशींचं अस्तर बिघडवून त्या फलित बीजाला गर्भाशयात रुजण्यास अडचण निर्माण करते. अशा त-हेने दोन प्रकारे ही गोळी काम करते. जर कोणतंही कुटुंब नियोजनाचं साधन न वापरता संभोग झाला व गर्भधारणा नको असेल, तर ही गोळी संभोग झाल्यावर शक्यतोवर २४ तासांच्या आत घ्यायची असते. जेवण करून मग गोळी घ्यावी. २४ ते २८ तासांच्या आत गोळी घेतली तर तिचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते. ४८ तास ते ७२ तासांच्या आत ही गोळी घेतली, तर तिचा परिणाम होण्याची शक्यता अजून कमी होते. त्याच्यानंतर ही गोळी घेऊन काहीही उपयोग होत नाही. ही गोळी घेतल्यावर मळमळायला होणं, ओटीपोटात दुखणं, स्तनं दुखणं, डोकं दुखणं असे परिणाम दिसतात. पुढची पाळी येण्याअगोदर अनेपेक्षितपणे योनीतून रक्तस्त्राव होवू शकतो. पुढची पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते. जर पुढच्या पाळीला एक आठवड्यापेक्षा जास्त उशीर झाला, तर गर्भधारणेची चाचणी करून ध्यावी. लेव्हेनोजेस्ट्रेल' या रसायनाची (या गोळीतील रसायन) अॅलर्जी असणाऱ्यांनी ही गोळी घेऊ नये. नसबंदी एकदा निश्चित झालं की आता आपल्याला याच्यापुढे मुलं नको आहेत तेव्हा पुरुष नसबंदी किंवा स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करून कायमची नसबंदी करता येते. पुरुष नसबंदी या नसबंदीत पुरुषाला भूल देऊन, त्याच्या दोन्ही वृषणांतील पुरुषबीज वाहिन्यांना छेद देऊन त्या नळ्यांची टोकं बंद केली जातात. ही शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ही शस्त्रक्रिया केल्यावर पुरुषाला थकवा येत नाही, त्याची लैंगिक क्षमता कमी होत नाही, पुरुषांच्या लैंगिक आनंदात कोणतीच बाधा येत नाही. पुरुषाचं लिंग नेहमीसारखं उत्तेजित होतं, वीर्यपतनही नेहमीसारखंच होतं. फरक २ ३ ४ २०८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख