पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

व्यवस्थित गोळी वापरूनही गर्भधारणा होणं.) हा निरोध, स्त्रीच्या गर्भनिरोधक गोळ्या, तांबी यांच्यापेक्षा जास्त आहे. डायफ्रम व सर्हायकल कॅप यांपैकी कोणतंही एक उपकरण कुटुंब नियोजनाचं साधन म्हणून वापरता येतं. आपल्या देशात ही साधनं फारशी वापरली जात नाहीत. पाश्चात्त्य देशात काही स्त्रिया याचा उपयोग करतात. ती गर्भाशयामुखावर बसवायची असतात. ती बसवायला व काढायला जरा अडचणीची असतात. डेपो-प्रोव्हेरा व नॉरप्लांट काही महिने पाळी येऊ नये म्हणून डेपो-प्रोव्हेराचं इंजेक्शन घेता येतं. एका इंजेक्शनने पाळी दोन ते तीन महिने थांबवता येते. या इंजेक्शनने शरीराला सूज येणं, मळमळणं, डोकं दुखणं असे परिणाम दिसतात. विशिष्ट रसायनं असलेल्या नॉरप्लांटच्या पट्ट्या शरीरात बसवता येतात. या पट्ट्यांतून विशिष्ट रसायनं शरीरात स्त्रवत राहतात व त्याच्यामुळे पाळी येत नाही. 'डेपो-प्रोव्हेरा' व 'नॉरप्लांट' हे प्रकार वापरण्याआधी त्यांच्या नजीकच्या व दूरगामी दुष्परिणामांबाबत संपूर्ण माहिती मिळवावी. स्त्रीयांना या साधनांचा खूप त्रास होऊ शकतो. इमर्जन्सी पील (उदा. आयपील, अनवाँटेड ७२ इ.) गर्भधारणा नको असेल तर कुटुंब नियोजनाच्या साधनाचा वापर अवश्य करावा. इमर्जन्सी पील घ्यायची वेळ येऊ देऊ नये. जर काही कारणामुळे कोणतंही कुटुंब नियोजनाचं साधन न वापरता योनीमैथुन झाला व गर्भधारणा नको असेल तर त्या स्त्रीनं अशा प्रकारची एक 'इमर्जन्सी' गोळी घ्यायची असते. ही दररोज घ्यायची गोळी नाही. जर स्त्रीबीज स्त्रीबीजांडातून परिपक्व होऊन बाहेर आलं नसेल तर ही गोळी, स्त्रीबीज परिपक्व होऊ देत नाही. जर परिपक्व स्त्रीबीज स्त्रीबीजवाहिनीत आलं मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २०७