पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे महत्त्वाचे काम आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक धोरणाबाबत शेतकरी संघटनेचा जो काही आदेश येईल त्याचे पालन करणे. तो आदेश मी काही देणार नाही. तो आदेश देण्याकरिता रामचंद्र बापू पाटील, भास्करराव बोरावके आणि विजय जावंधिया यांची समिती नेमली आहे. यांना आम्ही सांगितले की पुन्हा आम्हाला घाणीमध्ये पाठवू नका. काहीतरी जे काम करताना आनंद वाटेल असं करा. हे या अधिवेशनाचे निर्णय आहेत.

शेतकरी संघटना तिसरे अधिवेशन नांदेड १२ मार्च १९८९.

(शेतकरी संघटक २१ मार्च १९८९)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३७