पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशव्यापी आंदोलन उभे केले जाईल.
 आज आपण आपल्या पायावर उभे राहून आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य घडविण्याचा निर्णय घेत आहोत. सरकारचं अस्तित्व संपलं आहे. त्यांच्या हातातली शस्त्रं निकामी झाली आहे. आर्थिक संकट आलं आहे ते संपूर्ण देशावर नाही तर इंडियावर. इंडियावर आलेलं हे आर्थिक संकट म्हणजे वर्षानुवर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारताच्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे आणि म्हणून ही नवीन प्रकारची लढाई सुरू होत आहे.

(१० नोव्हेंबर १९९१ शेगाव मेळावा)
(शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर १९९१)


◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६८