पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मागण्या कराव्या लागतील.
 शेतकरी आंदोलनाचे उद्दिष्ट
 १९८० साली शेतकरी संघटना सुरू झाली ती काही फक्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता नाही चालू झाली. देशाचे दारिद्र्य म्हणजे शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे आणि शेतकऱ्याचे दारिद्र्य दूर करण्याकरिता काँग्रेसच्या शासनाकडून शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची कोणत्याही तऱ्हेने अपेक्षा करणे चूक आहे. जोपर्यंत गावागावांमध्ये शेतकऱ्याला बुडवणारे आणि वर 'आपणच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत' असे धादांत खोटे बोलणारी मंडळी किंवा त्यांचे मित्र उजळ माथ्याने फिरतात तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि स्वातंत्र्य मिळण्याची काही शक्यता नाही.
 पिंपळगाव बसवंतच्या सभेत जाहीर केलेला कार्यक्रम अजून चालूच आहे. तो मी पुन्हा सांगतो. गावागावातल्या सोसायटीच्याभोवती काही सैन्य आणून ठेवलेले नसते. गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे जाऊन त्या सोसायटीतले फक्त कागद सोसायटीच्या इमारतीवर आपला राग नाही, तेथील कर्मचाऱ्यांवर काही राग नाही, राग आहे तो फक्त आपल्या कर्जाच्या कागदांशी. ते कागद सोसायटीबाहेर काढून रस्त्यावर आणून जाळणे. हे महाराष्ट्रातील किमान दोन-तीन हजार गावांमध्ये १५ दिवसांत घडल्याची वार्ता दिल्लीला धडकली तर महिनाभरात देशातील यच्चयावत शेतकरी कर्जमुक्त होऊन जाईल.

(४ जुलै २००८ - शेतकरी मेळावा, सांगली)
(शेतकरी संघटक २१ जुलै २००८)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८३