पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्वातंत्र्यासाठी पोशिंद्यांचा संग्राम


 कातकराच्या विरुद्ध लढा उभारण्याकरिता एकत्र झालेले शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि इतर संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते भावांनो आणि बहिणींनो, जकातकराविरुद्ध लढा द्यायच्या कार्यक्रमांत मी पहिल्यापासून आहे; मुंबईच्या कार्यक्रमातही मी हजर होतो; पण स्वतंत्र भारत पक्षाने पुढाकार घेऊन जकातकराविरुद्ध जाहीररीत्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी हजर झालो आहे तो केवळ जकात रद्द करून घ्यावी एवढ्या किरकोळ उद्देशाने हजर राहिलो नाही. सुदैवाने, आज व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी एकत्र झाले आहेत. शेतकऱ्यांची वेगळीवेगळी आंदोलने चालू असताना - दुधाचे आंदोलन चालू असताना, उसाचे आंदोलन चालू असताना अनेक पत्रकारांनी टीका केली होती की एकाच जिल्ह्यातील दोन संघटना त्याच विषयांवरील आंदोलनांत वेगळ्या वेगळ्या का राहतात, त्या एकत्र का येत नाहीत? उसाकरिता आलो नाही, दुधाकरिता आलो नाही पण जकातविरोधी आंदोलनाकरिता दोन्ही शेतकरी संघटना आज या मंचावर उपस्थित आहेत याचा अर्थ समजावून घ्या. ही काही केवळ लहानशी लढाई नाही. शेतकऱ्यांची लढाई तीस वर्षे चालली, जकातीची लढाईसुद्धा छत्तीस वर्षे चालली आहे; पण समोरचा शत्रू असा आहे की त्याला जर टक्कर द्यायची असेल तर आपली एकेकट्याची ताकद कमी पडते आहे; आपण व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी सगळे एकत्र आलो आणि आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईची तुतारी फुकली तरच पुढची लढाई शक्य आहे हे समजावून देऊन त्या लढाईची आखणी करण्यासाठी मी इथे आलो आहे.
  व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे भांडण कधीच नव्हते. १९८० साली शेतकरी संघटना सुरू झाली तोपर्यंत कम्युनिस्ट नेहमी म्हणत की शेतकऱ्यांना आडते लुटतात, व्यापारी लुटतात. शेतकरी संघटनेने पहिल्यांदा सांगितले की हे खरे नाही. शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत या दोघांमध्ये तफावत आहे. ती आडत्यांच्या कमिशनमुळे नाही, ती व्यापाऱ्यांच्या नफ्यामुळे नाही तर,शहरातील

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४८