पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळी नावे खोटी आहेत. तुमचा प्रांत कोणताही असो, तुमची भाषा कोणतीही असो, तुमचे बियाणे कोणतेही असो सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकच पीक येते आणि त्या पिकाचे नाव आहे 'कर्ज'. गेल्या पंचवीस वर्षांत मला एकही शेतकरी असा भेटला नाही की त्याने कर्ज काढले, मेहनत करून शेती केली, पिकलेला माल बाजारात विकला आणि मिळालेल्या पैशांतून व्याजासहीत कर्ज फेडले आणि म्हणाला की आता मी सुखाने मरू शकेन.
 तेव्हा कोणतेही बियाणे पेरले तरी हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या शेतात पीक येते ते कर्जाचेच. पाऊसपाणी चांगले असेल तर येतेच येते, पण दुष्काळात अधिकच जोमाने येते.
 मग शेतकरी संघटनेने कर्जमुक्तीचा कार्यक्रम काढला. कर्ज फेडता येत नाही अशी अवस्था आली की व्यापारी/कारखानदार काय करतात? दिवाळखोरी जाहीर करतात. तसे आम्ही नादारीच्या कायद्याचा सखोल अभ्यास करून सगळ्या शेतकऱ्यांना नादारीचे अर्ज भरायला सांगितले. लोकांना मोठे वाईट वाटले की शेतकऱ्यांना नादार करायला निघालेत; पण खरेच कर्ज फेडता येणार नव्हते आणि 'सरकार नादान म्हणून शेतकरी नादार' हे पटल्यामुळे शेतकऱ्यांनी लाखोंनी नादारीचे अर्ज भरले; कोर्टामध्ये अर्ज ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आम्ही निकाल मिळवला की ज्या ज्या शेतकऱ्यांनी नादारीचे अर्ज भरलेले आहेत त्यांच्या नादारीच्या अर्जावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कर्जवसुलीसाठी कोणत्याही प्रकारे जप्तीसारखी कारवाई होऊ नये. हा नादारीचा कायदा मोठा जबरदस्त आहे. आजही, कर्जामुळे ज्यांना आत्महत्येच्या मानसिकतेकडे जाण्याची भीती वाटते त्यांनी कोण्या हेल्पलाईनपेक्षा किंवा मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजपेक्षा नादारीच्या कायद्याचा आधार घेणे फायद्याचे ठरेल. मुख्यमंत्र्यांनी १० डिसेंबरला विदर्भाच्या ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले त्यानंतर ढवदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग तिप्पट झाला आहे, तेव्हा ते पॅकेज काय कामाचे? १० डिसेंबरनंतर एकट्या विदर्भामध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कृपा करून आपला मोलाचा जीव धोक्यात घालू नका. तुमची शेती तोट्याची झाली हा तुमचा दोष नाही, सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे. त्यापेक्षा, कोर्टाकडे १५ रुपये स्टँप फी भरून नादारीच्या अर्जामध्ये आपल्या कर्जाची माहिती भरून तो सादर करा; तुमच्याकडे कोणीही जप्तीला येऊ शकणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तेव्हा, सावकारांच्याही कर्जामुळे ज्यांना आत्महत्या करावीशी वाटत असेल

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३६