पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घाट्यातल्या माणसाने दुसऱ्या घाट्यातल्या माणसाकडे येऊन काय फायदा? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे जा. दोनदोनशे कोटींची बिले थकलीत ती करा की वसूल. तोपर्यंत तुला वीजबिलाचा पैसासुद्धा इथे मिळणार नाही. वीज कापलीच तर काय करायचे ते आम्ही बघून घेऊ. मी तुझे काहीही देणे लागत नाही असे म्हटल्यानंतरही तू वसुलीचा तगादा लावला किंवा वीज कापायला आला तर तुला मी दरोडेखोर समजेन आणि स्वसंरक्षणासाठी मला कायद्याने जे अधिकार दिलेत त्यांचा वापर करीन.' त्याखेरीज, नव्यानेच वीज महामंडळाचे अध्यक्ष बनलेले श्री. बन्सल यांनी धमकी दिली आहे की वीज बिलांच्या वसुलीसाठी आम्ही सशस्त्र पोलिसांची तुकडी पाठवू. तिकडे लाल किल्ल्यात कडेकोट पहारा असतानासुद्धा पाकिस्तानचे अतिरेकी सरळ सरळ घुसून पहारेकऱ्यांना मारून पळून निघून जातात तिथे सशस्त्र पोलिस पाठविण्याऐवजी धानशेतकऱ्यांवर काय पाठवता? आपण एक लक्षात ठेवायचे. पोलिस असो का लष्करी जवान असो तो गणवेषात असला तरी तो जर का बेकायदेशीर कृत्य करीत असेल तर त्याला गणवेषातील दरोडेखोर म्हणायला हवे आणि हिंदुस्थानच्या कायद्यामध्ये दरोडेखोरांपासून स्वसंरक्षण करण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक वाटेल ते करण्याची कायदेशीर परवानगी आहे.
 दुसरे : बँकांची कर्जे थकली आहेत हे खरे. बँकेची माणसे वसुलीसाठी आली तर त्यांना सांगा, 'आपण समोरासमोर बसू या आणि हिशोब कागदावर लिहू या.' मग, बँकवाला लिहील, 'इतके इतके मुद्दल त्यावर इतके इतके व्याज म्हणजे एकूण देणे इतके इतके आपण शेतकरी, अशिक्षित. त्यालाच कागद घेऊन लिहायला सांगा, 'माझ्याकडे पाच एकर जमीन आहे. मी सत्तर क्विटल धान पिकवतो. धान पिकवायचा खर्च येतो क्विटलमागे १२०० रुपये आणि मला मिळतात ५०० ते ६०० रुपये. म्हणजे दरवर्षी ६०० रुपये प्रतिक्विटल सरकारच्या लोकांना मी फुकट खाऊ घालतो. म्हणजे एका वर्षाच्या ७० क्विटलचे ४२००० रुपये. अशी किती वर्षे मी खाऊ घालतो आहे, माझ्या आधी माझा बाप खाऊ घालत होता, त्याच्याआधी माझा आजोबा खाऊ घालत होता. म्हणजे, मी तुम्हाला काही देणे लागत नाही. उलट तुम्हीच मला लाखो रुपये देणे लागता. ते पहिल्यांदा काढा नाहीतर निघा इथून. एकदा का आपण कोणाचे देणे लागत नाही ही कल्पना स्पष्ट झाली की वसुलीसाठी जो कोणी येतो तो बँकेचा अधिकारी नसतो, तर दरोडेखोर असतो. त्याच्याशी कसे वागायचे ते कायद्याने सांगितले आहे.
 तिसरे : सांगली-मिरजच्या अधिवेशनात शेतकरी संघटनेने सगळ्या लोकांना

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८८