पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम..." शेतीमालाला भाव हा उद्देश नसून 'शेतकऱ्यांना माणूस म्हणून जगता यावे' याचे ते साधन आहे. शेतकऱ्यांच्या

लुटीला सोकावलेले सर्व प्रस्थापित आणि लालचावलेले असंतुष्ट या पिंजऱ्याचा खिळखिळा झालेला डोलारा मोठ्या ताकदीचा आणि गोरगरिबांच्या कल्याणरक्षणाचा आव आणून सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. शेतकरी वाघांनी आणि विशेषतः त्यांच्या तरुण रक्ताच्या बछड्यांनी या पिंजऱ्याला निर्णायक धडक मारून त्यातून बाहेर येण्याची आणि स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेण्याची हीच खरी संधी आहे.

(४ सप्टेंबर २०००- शेतकरी संघटना कार्यकारिणी, सांगली - मिरज.)
(शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०००)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५६