पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उदाहरणावरून सिद्ध झाले आहे आणि हिंदुस्थानही आता समाजवाद सोडून ज्याने त्याने आपल्या ताकदीने उभे राहण्याच्या खुल्या बाजारपेठव्यवस्थेची भाषा करू लागला आहे.
 खुल्या व्यवस्थेची नवी पहाट येते आहे आणि शेतकरी संघटनेच्या दृष्टीने ही एक आनंदाची आणि उत्सवाची गोष्ट आहे. कारण, शेतकरी संघटनेची लढाई याच एका उद्दिष्टाने चालू आहे. आता आपल्यातून उठून गेलेल्या कार्यकर्त्यांतील जे 'शेतकऱ्यांना सबसिडी मिळाली पाहिजे' म्हणू लागले आहे त्यांच्यातीलच एकाने शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात घोषणा दिली आहे की, "सूटसबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम" या विचाराला आज जागतिक मान्यता मिळाली आहे आणि शेतकऱ्याला आता चांगले दिवस येण्याची संधी प्रथमच मिळत आहे. कारण, जमिनीत एक दाणा टाकून त्यातून शंभर दाणे काढण्याचा चमत्कार शेतकरी करू शकतो. करीत आला आहे आणि करीत राहणार आहे. हे कोणा 'टाटा'ना जमणार नाही, कोणा 'बिर्ला'ना जमणार नाही. एक किलोच काय एक टन लोखंड टाकलं तर त्यात त्यांना एक ग्रॅमचीही वाढ करण्याची शक्यता नाही. शेतकरी हा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा भूमिपुत्र आहे. मग, हा चमत्कार हाती असलेला भूमिपुत्र हरतो कोठे? शिवारातून बाजारात जाताना वाटेत जे कोणी अडते, दलाल, व्यापारी, पुढारी, सहकारवाले, सरकारवाले मध्ये येतात ते सरकारी व्यवस्थेच्या आधाराने या भूमिपुत्राच्या हाती काही राहूच देत नाहीत आणि म्हणून परिस्थिती अशी तयार होते की, दुष्काळ पडला म्हणजे दाणे पिकवणारा खडे फोडायला जातो आणि शहरात राहून दाणे खाणारा मात्र आरामात राहतो. जर वाटेवरची ही लूट थांबली तर शेतकऱ्याला कोणाकडेही भीक मागायला जावे लागणार नाही. वाटेवरच्या लुटारूंचा काळ आता संपला आहे, बळिराज्य येत आहे.
 पन्नस वर्षांचं काळ्या इंग्रजांनी केलेलं शोषण, त्यामुळे आलेली भणंग अवस्था यानंतर आता नव्या पहाटेची चाहूल लागत आहे. सबंध जगामध्ये खुलेपणाचं वारं वाहात आहे. जागतिक व्यापार परिषदेच्या पुढाकाराने देशादेशांतील भिंती काढून टाकून संपूर्ण जागाचं एकच विश्व व्हावं अशा तऱ्हेचे नवे वारे वाहात आहेत.
 आणखी एक महत्त्वाचा फरक घडला आहे. इतके दिवस शेतकऱ्यांच्या शेतीचं जे मुख्य साधन बियाणं हे निसर्गात मिळणाऱ्या बियाण्यांतून घेतलेलं असायचं. जरा मोठा दाणा पाहिजे असेल, विशिष्ट चवीचा हवा असेल तर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५३