पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्घाटन भारताच्या राष्ट्रमतींच्या हस्ते होणार असून त्या समारंभातील उद्घाटनाचे भाषण भारताचे पंतप्रधान करणार आहेत. साऱ्या जगाचे कॅमेरे या परिषदेवर रोखलेले असतील. या परिषदेत भारतातील शेतीक्षेत्रापुढील प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्या चर्चेची पार्श्वभूमी कशी असेल ते त्या आधीच्या जालना ते तिरूपती ४० दिवस आणि तिरूपती ते दिल्ली ३० दिवस अशा ७० दिवसांच्या काळात भारतातील शेतकरी 'दारूड्या नवऱ्याच्या हाती पैसाही न देण्याचे' आंदोलन किती प्रकर्षाने करतात त्याने ठरणार आहे आणि जगाच्या व्यासपीठावर भारतीय शेतकऱ्यांचे आणि उद्योजकांचे स्वातंत्र्य आंदोलन पोहोचणार आहे.

फेब्रुवारी २०००- जालना मेळावा.
(शेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०००)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४९