पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


संस्कृत भाषा असो, अनुसूचितांचे मंडळ असो की एखादं प्रतिष्ठित प्रतिष्ठानमुक्तेश्वरांची प्रतिष्ठा सर्वत्र समभावी असते. ज्यांचं कोणी नाही त्यांचे होणारे मुक्तेश्वर म्हणून मला निराधारांचे मुक्तेश्वर वाटत आलेत. त्यांच्या कार्याचा गौरव भविष्यकाळातील नव्या पिढीत समाजशीलतेचा नंदादीप सतत तेवत ठेवील. चळवळ्या माणसाचा गौरव म्हणजे समाजातील संवेदनशीलता जपण्याची धडपड होय. मुक्तेश्वरांच्या जीवन व कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा!


माझे सांगाती/८९