पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. मुद्रण व्यावसायिक सतीश पाध्ये म्हणजे मुलखाचे सोशिक सद्गृहस्थ. अशी माणसं या आत्मरत व स्वार्थी काळात असू शकतात, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही आणि ते स्वाभाविकच म्हणायला हवे. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील म्हणजे कार्यसंस्कृत गृहस्थ. नित्य गुणवत्ता ध्यासातून नव्या पिढीचं कोटकल्याण करण्याचा छंद ते जोपासतात व शिक्षण क्षेत्रात एक प्रतिदर्श उभा करतात. या सर्वांबद्दल सहज भरतं येऊन मी लिहिलं ते केवळ एकाच हेतूने की, अशी समाजाप्रती तळमळ वर्तमान पिढीत झरावी; तर एकविसावे शतक माणसांचे राहणार!
दि. १५ मे २०१७

डॉ. सुनीलकुमार लवटे