पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


व संघटक म्हणूनही सर्व परिचित आहेत. एकदा एखाद्या व्यक्ती, संस्था, संघटनेबद्दल त्यांच्या मनात निष्ठा निर्माण झाली की ती अढळ असते. ते संघर्षात ज्या पक्षात असतात तो पक्ष विजयी समजायला हरकत नाही; कारण ते वातकुक्कुटासारखे भरकटणारे कार्यकर्ते नाही. विचारपूर्वक कृती, उक्ती नि कृतीतील अद्वैत हे त्यांच्या यशाचं खरं गमक होय. बार कौन्सिलचे अध्यक्षपद ही त्यांच्या कायकिर्दीची सुरुवात होय. भविष्यात त्यांना याहूनही अधिक धवल यश मिळावं. अशी एक हितचिंतक म्हणून शुभेच्छा! शुभास्ते पंथान: सन्तु!



माझे सांगाती/८५