पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तक मेळ्यात न चुकता हजेरी लावणारा भारतीय प्रकाशक म्हणून मेहता पब्लिशिंग हाऊसचा आज असलेला लौकिक. त्याचं स्वप्न पाहिलं होतं अनिलभाईंनीच. 'बाप से बेटा सवाई' बनवत त्यांनी मुलाला आपल्या सुनीलला जागतिक दर्जाचा प्रकाशक बनवलं. मराठीत ई-बुक परंपरा त्यांनी सुरू केली. ‘कॉर्पोरेट शो रूम'चं स्वप्न मराठी पुस्तकांनी पाहिलं ते मेहतांमुळेच. मध्यंतरी नोबेलची राजधानी आस्लोमध्ये जागतिक मान्यवर प्रकाशकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सारे प्रकाशक जागतिक भाषांचे (इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, इत्यादी) प्रादेशिक भाषांचे एकमेव अपवाद प्रकाशक होते मेहता. अखिल भारतीय प्रकाशक संघांचे वर्षानुवर्षे पदाधिकारी असलेले अनिलभाई. त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय अनेक पुरस्कार लाभले. मुद्रण, वितरण, उत्पादन, उत्कृष्ट साहित्य, भाषांतर, दिवाळी अंक, शासकीय सूची... कशात मेहता नाहीत हा संशोधनाचा विषय व्हावा असं असामान्य, अजब कर्तृत्व सिद्ध करणारे अनिलभाई! त्यांना दीर्घायुष्य लाभो! त्यांच्या हातून मराठी सारस्वताची सेवा अखंड होत राहो, हीच शुभेच्छा नि शुभकामना!

माझे सांगाती/७४