पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अजब प्रकाशक : अनिल मेहता

माझे सांगाती (Maze sangati).pdf

 ‘आजमितीचे मराठी साहित्याचे अव्वल प्रकाशक कोण?' असं जर महाराष्ट्राचं सार्वमत घेतलं तर तो कौल मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे संस्थापक अनिल मेहतांच्या नावाकडे झुकेल, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्याची कारणंही अनेक आहेत. एक तर अनिल मेहता महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात ‘टेंड सेटर' म्हणून ओळखले जातात. दुसरे असे की, आजचे सर्वाधिक ‘बेस्ट सेलर्स' त्यांचे लेखक होत. वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, आनंद यादव अख्खे वाचायचे तर अनिल मेहतांना पर्याय नाही. अरुण शौरी, तस्लिमा नसरीन, सुधा मूर्ती, किरण बेदींची मराठी वाचकांना जर कोणी ओळख करून दिली असेल तर ती अनिल मेहतांनी. आज तद्दन मराठी प्रकाशक मूळ मराठीपेक्षा भाषांतरित साहित्य प्रकाशनात अधिक रस घेताना दिसतात. ही पायवाट मळली कोणी तर ती अनिल मेहतांनी. डॉ. राजन गवस, इंद्रजित भालेराव, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. रवींद्र शोभणे, उत्तम बंडू तुपे, बाबाराव मुसळे यांना त्यांच्या पहिल्या साहित्यिक रचना प्रकाशित करून लौकिकार्थाने लेखक जर कुणी बनवलं असेल तर ते अनिल मेहतांनी. वि. स. खांडेकरांसारख्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या वारसांना तुटपुंजी रॉयल्टी मिळायची. सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक देऊन लेखकाचे मानधन लेखकाला त्याच्या हयातीतच मिळावे म्हणून 'केस लॉ

माझे सांगाती/७०