पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतिहासकाराच्या पठडीत ऐन उमेदीत त्यांना इतिहासाचे शास्त्रोक्त धडे व शिस्त मिळाली. ती त्यांनी पुढे आयुष्यभर जोपासली. ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास, जतन, तर्कसंगती लावण्याचे प्रारंभिक धडे व संस्कार जयसिंगरावांनी इथेच गिरविले.
 नंतर सन १९६९ मध्ये ते महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सन १९७५ मध्ये त्यांनी आपल्या मूलभूत संशोधनाच्या आधारे ‘महाराणी ताराबाई' हा चरित्रग्रंथ सिद्ध केला. ते महाराणी ताराबाईंचे पहिले इतिहासाधारित चरित्र ठरले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापुढे डॉ. धनंजय कीर, सेतुमाधवराव पगडी यांचा इतिहास वा चहिरत्र लेखणाचा आदर्श होता. सन १९७०-७५च्या दरम्यान सेतुमाधवराव पगडी यांची व्याख्यानसत्रे कोल्हापूरला होत. त्याना डॉ. जयसिंगराव पवार आवर्जून उपस्थित असत. त्याकाळात शिवाजी विद्यापीठात इतिहासकार न. र. फाटक, धनंजय कीर यांची ‘श्री शाहू स्मारक व्याख्यानमालेत' अशीच व्याख्याने होत. मार्च महिन्यात होणारी ही व्याख्याने मी गारगोटीहून येऊन ऐकल्याचे आठवते. त्यांनाही डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित असायचे असे आठवते. या सर्वांचा परिणाम त्यांच्या लेखनावर दिसून येतो.
 डॉ. जयसिंगराव पवार स्वत:ला वक्ते म्हणवून घेत नसले तरी ते व्यासंगी व विचारी वक्ते होत. मी सन २००५ मध्ये महावीर महाविद्यालयाचा प्राचार्य होण्याच्या काळात पानिपत'कार विश्वास पाटील यांची ‘संभाजी' कादंबरी प्रकाशित झाली होती. तिला मराठीतलं आजवरचं सर्वाधिक मोठं मानधन मिळाल्याने ती चर्चेत होती. आम्ही महाविद्यालयात त्या कादंबरीवर भव्य असं चर्चासत्र योजलं होतं. डॉ. जयसिंगराव पवार त्याचे अध्यक्ष होते. पानिपत'कार विश्वास पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी कादंबरी लेखनाबद्दलची भूमिका मांडली. नंतर अनेक नामांकित समीक्षक बोलले. अध्यक्षीय समारोप डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला. त्यात त्यांनी ‘इतिहास आणि सत्य' विषयावर जे विचार मांडले, ते बिनतोड तर होतेच; शिवाय इतिहास, साहित्य, सत्य, कल्पना यांचा गोफ गुंफत त्यांनी सत्याची वलयं विशद केली होती. कादंबरी व संभाव्य सत्याचा त्यांनी मांडलेला परीघ त्यांची साहित्यिक जाण अधोरेखित करणारा होता. इतरही दोन-चार वेळी मी त्यांची भाषणे ऐकली. मुद्देसूद, माफक परंतु विषयकेंद्री वक्तव्य ही त्यांच्या भाषणाची व्यवच्छेदक वैशिष्ट्ये असतात.
 विद्यमान शाह छत्रपती महाराज डॉ. जयसिंगराव पवार यांना किती। मानतात, त्यावरूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण रेखांकित होतं. मला


माझे सांगाती/६८