पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महोत्सव करण्याचे ठरले. त्या अमृतमहोत्सवाची वात डॉ. मंजू नि डॉ. मंजू नि डॉ. मेघानी लावली असली तरी त्याला उदबत्ती लावण्याचे काम डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते, हे फार कमी लोकांना माहीत असावे. डॉ. जयसिंगरावांच्या मितभाषीपणातही एक कणखर, प्रतिबद्ध स्वर दडलेला असतो, तो कामी आला.
 डॉ. जयसिंगराव पवार वृत्तीने प्रसिद्धिपराङ्मुख तसेच पदनिरपेक्ष व्यक्तिमश्रत्त्व. कुठलंही पद, जबाबदारी ते सहसा घेत नाहीत. त्यामागे त्यांचा कर्तव्यपरायण विवेक कार्यरत असतो. पद घ्यायचे तर त्याची जबाबदारी आपणाला निभावता आली पाहिजे, अशी त्यांची धारणा. मिरविण्यासाठी, प्रसिद्धी व प्रतिष्ठेसाठी पदामागे ते कधी लागल्याचे मला आढळले नाही. वृत्ती म्हणून ते पदनिरपेक्षच राहिले. मला या अनुषंगाने दोन प्रसंग आठवतात. शिवाजी विद्यापीठात डॉ. विलास संगवे शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदातून मुक्त झाल्यावर डॉ. माणिकराव साळुखे यांची फार इच्छा होती की डॉ. जयसिंगराव पवार यांनी ती धुरा सांभाळावी. ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ'मुळे त्यांची या क्षेत्रातील हकमत सिद्ध झालेली होती. मी वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचा संचालक म्हणून विद्यापीठात सक्रिय होतो. त्या वेळी त्यांनी हे पद स्वीकारावे म्हणून त्यांना गळ घालणान्यांमध्ये मीपण होतो, असे आठवते. त्या वेळी त्यांनी एक रुपये, नाममात्र मानधनावर ते पद स्वीकारल्याचे आठवते. पुढे त्यांनी उर्वरित कागदपत्रे संपादून, प्रकाशित करून आपली योग्यता सिद्ध केली, हे वेगळे सांगायला नको.

 तीच गोष्ट राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त पदाबाबत. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कार्यकाळातील ती गोष्ट. सन २००९-१० चा काळ असावा. तत्कालीन विश्वस्त सर्वश्री. बाबूरावजी धारवाडे व माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांना निवृत्तीचे वेध लागलेले होते. पर्यायी विश्वस्त निवडीच्या हालचाली सुरू होत्या. माझ्या मनी-मानसी नसताना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचा मला फोन आला व त्यांनी प्रस्ताव मांडला की, तुम्ही व डॉ. जयसिंगराव पवार यांनी विश्वस्त पदाची जबाबदारी स्वीकारावी. मी कॉम्रेड गोविंद पानसरे, बाबूरावजी धारवाडे, कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांच्याशी विचारविनिमय करून संमती कळविली; पण डॉ. जयसिंगराव पवार काही जिल्हाधिका-यांना दाद देत नव्हते. त्यांचा फोन आला, ‘काही करा; पण डॉ. जयसिंगराव पवारांना राजी करा.' मग एक दिवस मी नि कॉम्रेड पानसरे वेळ घेऊन डॉ. पवार यांच्या घरी गेलो. त्यांचा विचार करतो, कळवतो असा देंगे, दिलायेंगे मूड होता. ते पदापेक्षा जबाबदारी

माझे सांगाती/६५