पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वंचितांप्रती त्यांची संवेदना अतिदक्षतेची व प्राधान्याची असायची, हे मी नेहमी जवळून तीन वर्षे नित्य अनुभवलं आहे.
 जी गोष्ट सामाजिक कार्य नि कार्यकर्त्यांची तीच साहित्य, साहित्यिक व साहित्यिक उपक्रमांचीही. लक्ष्मीकांत देशमुख स्वतः मराठातील ख्यातनाम साहित्यिक होत. महाराष्ट्रात सनदी अधिकारी साहित्यिक असण्याची मोठी परंपरा आहे. पानिपत'कार विश्वास पाटील, कथाकार भारत सासने, पुरातत्व संचालक व कवी संजय कृष्णा पाटील अशी नावं सहज लक्षात येतात. लक्ष्मीकांत देशमुख यांचं साहित्यलेखन चतुरस्त्र आहे. कथासंग्रह, कादंबरी, वैचारिक, नाटक, संपादन असे विविधांगी लेखन केलेल्या या लेखकास त्यांच्या ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार लाभला; तसाच अलीकडे साप्ताहिकात चालवलेल्या ‘प्रशासननामा' सदराचं रूपांतर प्रशासनाची बरवर'ला अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार लाभला. या दोन्ही पुरस्कारांनी लक्ष्मीकांत देशमुख यांना मराठी सारस्वतःच्या पहिल्या पंक्तीत आणून बसवलं आहे. त्यांच्या लेखनाचं स्वतःच असं एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. त्यांचं सारं लेखन अनुभव व अभ्यासावर आधारित असतं. कल्पना त्यांच्या लेखणीस वर्थ्य असते. निव्वळ फिक्शन या काल्पनिक लिहिण्याचा त्यांचा पिंड नाही. त्यांच्या लिखाणाला स्वाध्याय, चिंतन, मनन, अनुभव, संशोधन इ. ची बैठक असते. कथांजली', ‘अंतरीच्या गूढ गर्मी’, ‘पाणी पाणी', 'नंबर वन'सारखे कथासंग्रह; ‘सलोमी', ‘अंधेरे नगर', 'होते कुरुप वेडे'सारख्या कांदबया आणि ‘दूरदर्शन हाजिर हो'सारखं बालनाट्य (ते आम्ही ग्रंथमहोत्सवात अभिनित केलं होतं.) सर्वांत हे वैशिष्ट्य चपखलपणे लक्षात येतं.

 पुस्तकं हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा नर्मबिंदु (विक पॉइंट). प्रशासनाच्या धबडग्यातून त्यांना वाचन, लेखणाची ऊर्मी शिचकच कशी राहते हा माझ्या औत्सुक्याचा, जिज्ञासेचा व खरं तर संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. ते जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूरला कार्य करतानाच्या काळात मी अनेकदा त्यांच्या कार्यालयात तासनतास निरीक्षण केलं आहे. हा माणूस सनदी कार्यातही तितकाच तज्ज्ञ व दक्ष! आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, महसूल, नियोजन, राजकारण इ. गव्हर्नन्स, निवडणूक, मंत्रालय कार्यपद्धती सर्वाचा त्यांचा आवाका आश्चर्यचकित करून सोडणारा. ते अष्टावधानी व अष्टपैलू प्रशासक होत. अधिकारी घेऊन आलेलं फोल्डर त्या अधिका-याला पाहताच लक्षात कसं येतं हे अजून मला न उलगडलेले कोडं आहे. आलेल्या प्रत्येकाशी म्हणजे चपराश्यापासून ते चेअरमन, आमदार, खासदार सर्वांशी त्यांचं वागणं माणूसपणाचं

माझे सांगाती/५९