पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नि हलाखीचा होता. ते तसे मूळचे सटवाईवाडीसारख्या छोट्या गावातील हे गाव तेरखेडा पोस्टाच्या पंचक्रोशीतील. वाशी तालुका, जिल्हा उस्मानाबादमधलं हे खेडं. घरची गरिबी. शिक्षण घेणं दिव्यच होतं. तशातून ते केवळ परिस्थितीची जाण म्हणून शिकत राहिले. सन १९७० च्या दरम्यान ते औरंगाबाद बोर्डातून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना ५०टक्के गुण मिळवणं मोठं कष्टाचं गेलं होतं; पण परिस्थितीशी मुकाबला करायचा, शिकलो तरच जगता येईल असं भान आलेल्या या तरुणानं मग मागे वळून पाहिलंच नाही. पदवी परीक्षेत प्रथम वर्ग मिळविला नि पुढे तो कायम टिकविला. जे करायचं ते ‘फर्स्ट क्लास' असं त्यानं बहधा मनाशी ठाणलं होतं; म्हणून पुढील सर्व परीक्षांत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेले. लौकिक अर्थाने ते कुशाग्र बुद्धीचे नव्हते; पण कष्टसाध्य यशावर त्यांचा विश्वास होता. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्कारांचं बाळकडू प्यायलेला हा तरुण त्यांच्याच संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून रुजू झाला. एम. एस्सी. बी.एड. अशी पात्रता पदरी होती. तसे ते वरिष्ठ महाविद्यालयास शिकविण्यास पात्र होते; पण त्या वेळी त्यांच्या विषयाची जागा नजीकच्या भविष्यात निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती.
 विकासाचं वारू कानांत भरलेला तरुण प्रा. मधुकर फरताडे; त्यांनी रयत शिक्षण संस्थेत अर्ज केला. केवळ स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेवर ते 'रयत'मध्ये दाखल झाले. पंढरपूर, मंचर, कोपरगाव अशा ठिकाणी बदल्या होत राहिल्या. या त्रिविध ठिकाणी काम करीत, कार्यानुभव घेत, त्यांनी स्वत:ला कुशल प्रशासक सिद्ध केला. ते ज्या महाविद्यालयात गेले, तिथे विद्यार्थी वर्गात त्यांनी आपल्या कार्य, कर्तृत्व व अध्यापनाने दरारा निर्माण केला. मी मध्यंतरी कोपरगावला व्याख्यानासाठी गेलो होतो. काही प्राध्यापक भेटले. ते डॉ. फरताडे सरांचे विद्यार्थी निघाले. गप्पांच्या ओघात विद्यार्थ्यांकडून त्यांचं व्यक्तिमत्त्व समजलं. तो विद्यार्थी म्हणाला, “सर म्हणजे टेरर होते; पण तितकेच प्रेमळ, फणसासारखे होते. बाहेरून ओबडधोबड. प्रसंगी काटेरी बोलणार; पण वेळ आली तर जीवपण देणार. त्यांचा गर ज्याला सापडला तो त्यांचा जिगर होणार.' मला त्यांचा हा गर सापडला तो स्मृतिसंग्रहालयाच्या कामात नि ते माझे जिगर झाले.

 ते माझे जिगर व्हायचं आणखी एक गुपित होतं. मी प्राचार्य म्हणून काम करून निवृत्त झालो होतो. प्राचार्यांचं सुखदु:ख प्राचार्यालाच माहीत. प्राचार्यांची स्थिती ब-याचदा मृदंगासारखी असते. प्राध्यापक व संस्था दोन्हीकडून त्याला थपडा बसत असतात. तरी त्याला कॉलेजचा नाद, नूर टिकवायचा असतो. इथं

माझे सांगाती/४९