पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


एकांतातून ते आपली मूक नाराजी व्यक्त करीत राहतात. ती त्यांची खानदानी अदाकारी त्यांच्या सुसंस्कृत व्यवहाराची नजाकत असते. असे आमचे मित्र, साहित्यिक, समाजसेवक बाबूराव शिरसाट! निवृत्तीच्या निमित्ताने म्हणून त्यांचा होणारा गौरव म्हणजे त्यांच्या जीवन व कार्याचे समाजाने केलेले कृतज्ञ स्मरण! त्यांच्या समाजोपकारी ऋणातून मुक्त होण्याचा तो मुक्ती सोहळा! त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा! बाबूरावांना दीर्घायुष्य लाभो असं शुभचिंतन करण्यात माझा सामाजिक स्वार्थ दडला आहे. त्यामुळे समाजाची दीर्घकाळ सेवा त्यांच्या हातून घडत राहावी, अशी अपेक्षा त्यामागे आहे.

जीवेत शरदः शतम्।


माझे सांगाती/४२