पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


स्थायिक आहे. तिथे सदर्न क्रॉस कॉम्प्युटर सिस्टीममध्ये तो व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी नि आमची मोठी सून सौ. ऊर्मिला कायद्याची पदवीधर आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. पुमोरी तिचं नाव. ती ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात असलेल्या मोनॅश विद्यापीठात सध्या पदवी शिक्षण घेत आहे. छोटा मुलगा अभिजित व्यवसायात आला आहे. मी उत्तराधिकारी म्हणणार नाही; तरी परंतु त्यानं स्वत:चं असं स्थान निर्माण केल्याचा आम्हाला आनंद आहे. तो सहकारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारचे दावे माझ्याप्रमाणेच चालवितो. धाकटी सून जैन तत्त्वज्ञानासारख्या अवघड विषयातील पदवीधर आहे. सौ. स्नेहलता तिचं नाव. त्यांना दोन मुले चि. ईशान व चि. पिनाक असून, दोघेही शिक्षण घेत आहेत. आमचं एकत्र कुटुंब आहे. सुखी, समाधानी कुटुंबात मुद्दाम वेळ काढावा लागत नाही. तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कुटुंबातच असता, जर तुम्ही ख-या अर्थाने संसारी असाल तर. मी तसा आहे खरा!
 तुम्ही एक ट्रस्ट स्थापन केल्याचं मी ऐकून आहे.
 होय. ‘अॅड. के. ए. कापसे ट्रस्ट'ची स्थापना आम्ही सन २००२ मध्ये केली. यातून आजवर होतकरू व गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य केले जाते. या संस्थेमार्फत वक्तृत्व स्पर्धा आणि ग्रंथदान, इत्यादी केले जात असून ते चिरंतन आणि निरंतर चालू राहील, अशी व्यवस्था ट्रस्टच्या घटनेत केली आहे.
 तुम्ही शिकविलेल्या आणि मान्यवर झालेल्या वकिलांचीही मोठी परंपरा आहे ना?
 अॅड. लुईस शहा, अॅड. बाबा नेले, अॅड. दिलीप मंगसुळे, अॅड. डी. ए. मादनाईक व अॅड. राम मुदगल यांसारखे प्रख्यात वकील योगायोगाने माझे ज्युनिअर्स. त्यांचा लौकिक हा माझ्या अभिमानाचा विषय आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील अमित बोरकर हेही माझेच विद्यार्थी. अशी अनेक नावे सांगता येणं शक्य आहे.
 तुम्ही शिवाजी विद्यापीठातही विविध स्तरांवर कार्य केलंय हे खरं का?

 अहो, खरं म्हणजे मी सिनेट. अकॅडमिक काउन्सिल इतकंच काय, सन १९८४ ते १९८७ व १९९० ते १९९३ या काळात विधी विद्याशाखेतून निवडून येऊन शिवाजी विद्यापीठाच्या विद्याशाखेचा डीन व मॅनेजिंग काउन्सिलचा सक्रिय सदस्य होतो. त्या काळात अनेक कसोटीच्या प्रसंगांत माझं विधिकौशल्य

माझे सांगाती/२४