पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकारतो नि हसत सांगतो. बरं, त्याला बोच नसते असे अजिबात नाही; पण तो व्यवहारिक पातळीवर जपानीच म्हणायचा. जपानी माणूस दुसन्यास दोष देत नाही. स्वत:स दोषी मानून हाराकिरी करतो. म्हणजे आत्मक्लेश करून घेतो. शिवाजी पेठेत जन्मून, राहून हा ‘सत्यं शिवं सुंदरम् कसा हे माझ्यासाठी तरी गूढच. दुस-या शब्दांत शिवाजी पेठेत राहून हा ‘सदाशिव पेठी' पण नाही झाला. याची पेठ सदा शिव, सुंदरच राहिली.
 पांढ-यावर काळे करणारा या अर्थाने तो सरस्वतीपुत्रच म्हणायचा. धंद्याच्या धबडग्यातूनही त्याचं वाचन चोखंदळ राहिलं आहे. पत्नी स्वातीताई यांना लिहायचं अंग, तर सतीशला वाचायचं अंग. त्याची गि-हाईके पाहिली की लक्ष्मीपुत्रांपेक्षा सरस्वतीपुत्रांचाच गराडा त्यांच्या छापखान्यात असतो. 'मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स' या उक्तीवरूनही सतीशची प्रतवारी करता येते. कौटुंबिक, भारतीय म्हणून तो दोन मुलींचा बाप; पण मुलीचा बाप म्हणून त्याला पैशाचा घोर लागलाय असं मी कधी अनुभवलं नाही. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला.' मानणारा नि म्हणणारा सतीश. त्याचं दुकान सदैव तुकारामाचंच राहिलंय. गि-हाईक पैसे द्यायला मोठ्या नोटा काढतं. सतीशकडे सुट्टे पैसे अपवादानेच! (कारण संचय त्याला माहीतच नाही!) सतीश क्षणाचा विचार न करता ‘पुढच्या वेळी द्या' म्हणतो. चौकात जाऊन मोड करून भागवाभागवी त्याला जमत नाही. तो सदैव दुस-याच्या ऋणात. गि-हाईक सदैव सतीशच्या ऋणात. “आज उधार, उद्या रोख' या तत्त्वानेही त्याची उपजीविका कशी चालते विचाराल तर त्याचं सतीशचं उत्तर जीवनाचा आनंद केवळ रुपये, आणे, पैशात नसून तो प्रेम, संबंध, आपलेपणातही शोधता येतो. हे शिकावं सतीशकडूनच. सतीशकडे कधीही मागा, तो 'नाही' म्हणत नाही, ही त्याची श्रीमंती.

 मी महावीर महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याच्या काळात सतीश आमचं मुद्रण सांभाळायचा. वेळेवर, नेटकं कामही त्याची खासियत असायची. कामात तो जीव ओतून सुधारणा करायचा. पाच वर्षे त्यानं आमचं नियतकालिक छापलं. चौथ्या वर्षी ते विद्यापीठात प्रथम आलं. त्या दर्जेदारपणात सतीशचा सिंहाचा वाटा. निर्दोष, शुद्ध, सुबक छपाई, मोत्याचे टंक, शुभ्र कागद... अगदी जाहिरात रचनाही ललित, मनोहर करावी ती सतीशनी. व्यवसाय प्रेमाने भागत नाही. तो कलात्मक नि मनस्वीपणा करता आला पाहिजे. तो करावा सतीशनेच. ते येरागबाळ्याचे काम नव्हे! | आपल्या व्यवसायात समाजशीलता जोपासायचा रिवाज सतीश जपत आला आहे. बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी 'चॉकलेट बुक'ची कल्पना

माझे सांगाती/११४