पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थेच्या मुख्यालयात ही मुलाखत संपन्न झाल्याचेही आठवते. आमचे मित्र प्राचार्य डॉ. अशोक जगताप समन्वयक होते.
 निवडीनंतर ते तळमावले, इचलकरंजी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याचे वृत्तपत्रारतील बातम्यांमधून लक्षात यायचे. शिवाजी विद्यापीठातील प्राचार्यांच्या बैठकांना ते उपस्थित असत; पण दुरूनच त्यांचा माझा स्मितहास्य संवाद होत राहायचा. यातही स्नेह, आदर व्यक्त व्हायचा. तो त्यांच्या देहबोलीतून. ते माझ्यापासून दोन हात दूरच राहत असत. त्यात टाळण्यापेक्षा सदभावपूर्वक अंतर ठेवण्याची नजाकत असायची. फळांनी लगडलेलं झाड झुकत राहतं, तसा तो नम्रभाव असायचा नि त्याने मी आनंदून जायचो. स्वरंजनाबरोबर परभावसहिष्णुता म्हणून मीही तुम्ही ठीक, मी ठीक' अशा अंतराने थोडा दूर नाही, पण तटस्थ राहत असे.

 माझे मित्र प्राचार्य डॉ. अशोक जगताप प्राचार्यपदावरून पायउतार झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रा. एच. बी. पाटील हे प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील होऊन रुजू झाले. आता आम्हा उभयतांचे नाते शेजा-याचे व विधायक अंगाने प्रतिस्पध्र्याचे झाले. निरोप व स्वागत संयुक्त समारंभातून ते अधिक स्पष्ट झाले. त्यांच्या नि माझ्यात खरा हार्दिक सद्भाव निर्माण होण्यास एक कारण घडले. त्या वेळी शासनाने इयत्ता अकरावीचा प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचे समन्वयक यजमानपद माझ्याकडे सुपूर्द केले. शैक्षणिक व्यासपीठाने या पद्धतीचे समर्थन केल्याने काम सोपे झाले; कारण बहसंख्य महाविद्यालयांनी केंद्रीय प्रवेश पद्धती स्वीकारली. दोन महाविद्यालये अपवाद होती. एक होते शहाजी महाविद्यालय व दुसरे होते विवेकानंद महाविद्यालय, माझ्या महाविद्यालयात संपन्न केंद्रीय प्रवेश समिती बैठकीस प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील एकदा उपस्थित झाले. त्यांना या प्रवेशाचे महत्त्व पटले; पण निर्णय संस्था घेणार होती. त्यांनी आपले मत सांगून संस्थेस राजी केले. यात मला पहिल्यांदा प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांच्या स्वतंत्र मत, गुणवत्ताप्रधान प्रशासकीय निर्णयक्षमतेची चुणूक अनुभवण्यास मिळाली. हा निर्णय तसा साधा, सोपा नव्हता. होकाराने विवेकानंद महाविद्यालयाची गुणवत्ता महाविद्यालय प्रथम पसंतीची जात असली तरी प्रवेशाच्या वेळी होणारी डोकेदखी कायमची थांबणार होती, हे त्यांनी हेरले. शिवाय विनाअनुदान तुकड्यांची सारी फी प्रवेश पूर्व महाविद्यालयाकडे जमा होण्याची हुकमी हमीही त्यांनी हेरली होती. पहिल्या वर्षी पालकांचा प्रचंड विरोध होता. पहिल्या पालक सभेत तर पाच हजार पालक माझ्या अंगावर आल्याचे आठवते. दमदाटी, राजकीय निदर्शने, इ. पाहून प्राचार्य पाटील हबकून गेले होते. दुस-या

माझे सांगाती/१०८