पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर सर्व बैठका योजणे, इतिवृत्त नोंद, दैनंदिन संस्था भेट, देणगी जमा करणे ही कामे ते हिरिरीने करीत. सलग दोन वर्षे ते रिमांड होमचे सचिव होते. स्थापना सभेत रिमांड होम स्थापन करण्याचा ठराव प्रिं. दाभोळकर यांनी मांडला होता. वसंतराव घाटगे यांनी त्या ठरावास अनुमोदन दिले होते. स्थापनेनंतर सुमारे ५० मुलांची सोय करण्यासाठी आवश्यक ती खरेदी, जुळवाजुळव, देखभाल करण्याचे प्रत्यक्ष काम वसंतराव घाटगे यांनी केले होते. श्री. वसंतराव घाटगे रिमांड होम राज्य संघटनेचे सदस्यही होते. आजचे बालकल्याण संकुल म्हणजेच पूर्वीचे रिमांड होम, हे फार कमी लोकांना माहीत असेल. यावरून वसंतराव घाटगे यांच्या कार्याची दृष्टी व योगदान लक्षात येईल.

माझे सांगाती/१०२