पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१०८
 

आता दक्षिणेतील कांची येथील पल्लवांची सत्ता नष्ट होऊन तेथे चोल घराणे आरूढ झाले होते. त्यामुळे चालुक्यांच्या चोलांशी पिढ्यान् पिढया लढाया सुरू झाल्या. चालुक्यराज पहिला सोमेश्वर ( इ. स. १०४९-१०६८) हा विशेष पराक्रमी होता. त्याने चोलांचा पराभव करून कांची ही त्यांची राजधानी घेतली (इ. स. १०५२ ). पण पुढे १०६२ साली चोलराजा वीरेंद्रराज यांच्याशी वेंगीच्या चालुक्यांच्या वारशाच्या प्रकरणावरून सोमेश्वरचा पुत्र विक्रमादित्य याची लढाई झाली. तीत विक्रमादित्याचा पराभव झाला.

विक्रमादित्य
 हा विक्रमादित्य विशेष पराक्रमी होता. त्याच्या पित्याने त्याचा वडील भाऊ सोमेश्वर २ रा यास बाजूस सारून त्यालाच युवराज नेमण्याचा विचार केला होता. पण त्याने बंधुप्रेमामुळे ते मान्य केले नाही. पुढे १०६८ साली पिता सोमेश्वर १ ला याने काही रोगाने जर्जर होऊन जलसमाधी घेतली. तेव्हा प्रथम सोमेश्वर २ रा हाच गादीवर आला. पण काही काळानंतर दोघा बंधूंचे सख्य राहिले नाही. त्यामुळे सोमेश्वराने विक्रमाचा काटा काढण्याचे ठरविले; पण विक्रम फार पराक्रमी असल्यामुळे बाजू त्याच्यावरच उलटली. विक्रमाने त्याचा पराभव करून विक्रमादित्य ही पदवी घेऊन राज्यारोहण केले. हा विक्रमादित्य ६ वा हा या चालुक्य कुळातील सर्वश्रेष्ठ नृपती होय. त्याने इ. स. १०७६ ते इ. स. ११२३ पर्यंत म्हणजे पन्नासएकावन्न वर्षे राज्य केले. त्याचा दरबारकवी बिल्हण याने 'विक्रमांकदेवचरित' या आपल्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे उत्तम वर्णन केले आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील 'मिताक्षरा' ही विख्यात टीका लिहिणारा विज्ञानेश्वर विक्रमाच्या काळी कल्याणीसच रहात होता. त्यानेही विक्रमासारखा राजा कधी झाला नाही, असा त्याचा गौरव केला आहे. याच्या कारकीर्दीत द्वारसमुद्र तथा हळेबीड येथील होयसळ यादव हे वैभवास येत होते. पूर्वीचे शत्रू कांचीचे चोल व हे नये होयसळ यांशी झालेल्या लढायांत विक्रमादित्याचा बराच काळ गेला. पण त्यास दीर्घायुष्य लाभल्यामुळे प्रजारंजनाचीही पुष्कळ कार्ये त्यास करता आली.
 त्याचा पुत्र सोमेश्वर ३ रा ( इ. स. ११२६-३८ ) याच्या कारकीर्दीत युद्धे फारशी झाली नाहीत. स्वस्थता बरीच होती. 'मानसोल्लास ' तथा ' अभिलपितार्थ चिंतामणी' हा राजनीति शास्त्रावरचा जो प्रसिद्ध ग्रंथ तो याच सोमेश्वराचा होय. त्याच्या मागून त्याचा पुत्र जगदेकमल्ल हा गादीवर आला व त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ तैलप ३ रा हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत चालुक्यसत्तेस उतरती कळा लागून इ. स. ११५० च्या सुमारास तिचा अस्त झाला. तैलपाचा सेनापती विज्जल याने त्याला कैद करून स्वतः गादी बळकाविली. विज्जल हा चेदी देशाच्या कलचूरी घराण्यातील होय. हे घराणे चालुक्यांचे मांडलिक होते. विज्जलाच्या या कलचूरी