पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०) संस्थागत संगोपनात कमी गरजांमध्ये सुखी राहण्याचे रहस्य आपोआप उमजते.
 पर्यायाबाबत विचार
 १) जोवर संस्थाबाह्य सेवांचा विकास होत नाही तोवर विद्यमान संस्थांची भौतिक व भावनिक समृद्धी कशी वाढेल, हे पहायला हवे.
 २) किमान ५० व कमाल १०० लाभार्थी संख्येची संस्था हे परिमाण निश्चित करून किमान ५ मुलांमागे १ कर्मचारी असे सूत्र स्वीकारायला हवे.
 ३) कर्मचारी वर्गात कोणत्याही एका संस्थेत अधिकारी, लिपिक, शिक्षक, काळजीवाहक, आचारी, माळी, भंगी, कलाशिक्षक, समुपदेशक, डॉक्टर ही पदे असायलाच हवीत.
 ४) कर्मचा-यांचे संस्था/सेवांतर्गत सतत प्रशिक्षण ठेवून त्यांना बालसेवी बनवायला हवे. ते पहारेकरी नसून पालक आहेत ही भावना वाढवायला हवी.
 ५) संस्थेचा समाज संपर्क वाढीवर भर हवा.
 ६) मुले लवकर घराकडे जातील, हे पाहायला हवे.
 ७) व्यक्तिगत लक्ष अनिवार्य व्हावे.
 ८) पर्यायी संगोपन योजना (प्रतिपालक, दत्तक इ.) वाढवाव्यात.
 ९) संस्था, घर, शाळा, विकास केंद्रे बनवावीत, कोंडवाडे नकोत.

 १०) विद्यमान संस्थांचा किमान दर्जा निश्चित करून तो टिकावा म्हणून उपाय योजावेत.

८६...दीर्घकालीन संस्थात्मक बालसंगोपनाचे परिणाम