पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९) व्यक्तिगत स्वच्छतेकडे संख्याधिक्यामुळे दुर्लक्ष झाल्याने बालवयातील मुले सररास सांसर्गिक रोगाचे बळी ठरतात.
 १०) संस्थागत संगोपन ‘सब घोडे बारा टक्के' पद्धतीचे असल्याने केशरचना, पोषाख, परिपाठ यात साचेबंदपणा राहिल्याने मुलांची व्यक्तिगत ओळख व अस्तित्व राहात नाही.
 ११) समाज व घरातील अन्य मुलांपेक्षा आपण वेगळे नि दुय्यम दर्जाचे आहोत. अशी विविध प्रसंग व पद्धतीतून होणारी जाणीव मुलांना असामान्य (अॅबनॉर्मल) बनवत राहते.
 १२) संस्थेत सण, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमही यांत्रिक पद्धतीने होत राहिल्याने मुलांचा त्यातील सहभाग गायलेल्या जागा भरण्यापुरता असतो.
 १३) कर्मचारी व मुले यात पालक-पाल्य संबंध व संवादाच्या अभावी मुले अबोल राहतात.
 १४) संस्थात्मक संगोपनातील सामूहिक निवास (डॉर्मेटरी) पद्धतीमुळे मुले/ मुली सररास समलिंगी संबंधाचे बळी ठरत राहतात. कधी-कधी ते अधिकारी, कर्मचा-यांच्या विषयवासनेचे हुकमी गुलाम ठरतात.
 १५) अधिकारी, कर्मचा-यांच्या भ्रष्ट व्यवहारामुळे मुलांना या काळात वाममार्ग आपसूक समजतात.
 (२) सुपरिणाम
 १) संस्थागत संगोपनात मुले लवकर स्वावलंबी होतात.
 २) संस्थागत परिपाठामुळे मुले शिस्तप्रिय होतात.
 ३) संस्थागत संगोपनात मुलांना जबाबदारीची जाणीव लवकर होते.
 ४) संस्थांतील मुले आज्ञाधारक असतात.
 ५) संस्थागत संगोपनात लाडाने मुले बिघडणे शक्य असते.
 ६) समजूतदार मुलांसाठी संस्था विकास केंद्रे ठरतात.
 ७) संस्थागत संगोपनामुळे मुलांच्यात समूहवृत्ती जोपासली जाते.
 ८) सामुदायिक जीवन जगण्याची कार्यशाळा म्हणजे संस्था.

 ९) संस्थागत संगोपनात मुले हरहुन्नरी बनतात.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...८५