पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महिला, अपंग व बालकल्याण संचालनालय : स्वरूप व कार्यपद्धती


 सद्यःस्थिती
 सध्या आपल्या राज्यात समाज कल्याण संचालनालयामार्फत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचे क्रियान्वय होत आहे. मागासवर्गीय कल्याण योजनांसाठी प्रथमतः मागासवर्गीय कल्याण संचालनालय सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर त्याचे रूपांतर समाज कल्याण संचालनालयात करण्यात आले. या संचालनालयामार्फत सध्या खालील प्रकारचे कार्य केले जाते-
 १) मागासवर्गीय कल्याण योजनांची अंमलबजावणी
 २) अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी कल्याण योजनांचे क्रियान्वय
 ३) सुधार प्रशासन व सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी
 ४) अपंगांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन
 ५) महिला कल्याण योजनांची अंमलबजावणी
 ६) आदिवासी जीवनविषयक संशोधन
 ७) दारूबंदी : प्रचार व शिक्षण
 शाखानिहाय विभाजन
 हे कार्य सुसूत्रपणे व्हावे म्हणून सध्याच्या समाज कल्याण संचालनालयात कार्यनिहाय खालील शाखा कार्यरत असून त्यांची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे.
 १) मागासवर्गीय कल्याण शाखा
 २) सुधार प्रशासन शाखा
 ३) अपंग कल्याण शाखा

 ४) महिला कल्याण शाखा

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...६३