पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यासाठी मोठ्या समाजप्रबोधन, चळवळ व भावसाक्षरतेची गरज आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई यांचे जीवन व कार्य प्रमाणभूत मानून या संस्थांची व तेथील संगोपन, पुनर्वसन योजनांची मांडणी व व्यवस्था झाल्यास संस्थेतील बालकांना सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य लाभेल. ते देणे शासन व समाजाचे आद्य कर्तव्य आहे.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१२१