पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंदिस्त बालपण मोकळं करण्याचे शिवधनुष्य उचलायला हवं. आई-वडील असलेल्या मुला-मुलींची जीवन व शिक्षण सर्जनशील,आनंददायी करण्याआधी या वंचित बालकांचा, जीवन असं होण्याचा त्याचा पहिला अधिकार आहे. एकविसावं शतक हे वंचित विकासाचं शतक ठरणार असेल, तर बालकांचं एक सेझ निर्माण व्हायला हवं. अनाथांचा त्यांच्यावर एकाधिकार हवा. महान भारतात एक सेझ बालनगरी उभारली, तर उद्याचा भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...११५