पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकस, राग नाही. असेलच तर कृतज्ञताच! पण तरी माझा आग्रह आहे. आपण कालपेक्षा आज चांगले करत असू तर अपघात वारंवार का? बलात्कार का? आपण नोकर म्हणून पाटी टाकत असू, ती अधिक भरून का नाही टाकायची? ११ एप्रिल १९५०ला मी अनाथ होतो. ११ एप्रिल २०१३ ला समृद्ध सनाथ आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात संस्थाश्रयीचं फुललेलं घर कुटुंब आहे.... हे संस्थेतल्या सर्वांना लाभायचं तर प्रत्येक संस्था 'घर' द्यायला हवी. हवालदार काका, मामा द्यायला हवेत. अधिकारी फादर, बाबा काळजीवाहिका ताई, माई, मावशी! तुम्ही या सर्वांचे जिवाभावाचे नातलग!

११०...महिला व बालकल्याण संस्थांतील लैंगिक शोषण