पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव

आणि

योगी अरविंद घोष


 श्री. ऑरोबिंदो ऊर्फ (श्री. अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
 अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पश्चिम बंगालमधील कलकत्ता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. कृष्णधन घोष आणि आईचे नाव सवु र्णलतादेवी होते. अरविंदांचे वडील कट्टर ‘आंग्ल’ वृत्तीचे होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण इगं ्लंडमध्ये झाल्याने कदाचित त्यांच्या मनावर ‘आंग्ल’ वृत्तीचा पगडा बसला असावा. म्हणून पुढे त्यांनी आपल्या अरविंदासहित इतर पुत्रांना दार्जिलिंग येथील लोरेंटो विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवले; पण तेथील शिक्षणपद्धतीवर त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून अरविंद सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी इगं ्लंडला पाठवले. तेथे विल्यम ड्रेवेट दांपत्याकडे शिक्षणासाठी ठे वले. काही काळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / 6