पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील लोकांनी त्यांनी बडोदा सोडू नये म्हणून प्रयत्न केले; परंतु कोणालाही यश मिळाले नाही. त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते. यावेळी त्यांना बडोद्यातून आपल्या मातृभूमीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांचे बंधूही आले होते.
 महायोगी अरविंद घोष यांना निरोप देण्यासाठी महाराजांनी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन केले. या निरोपाच्या दिवशी बडोद्यातील वातावरण अतिशय दुःखमय बनले होते. ११ जानेवारी १९०९ रोजी ज्यावेळी योगी अरविंद कलकत्त्याकडे जाण्यास निघाले त्यावेळी समस्त बडोदेकरांच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहत होत्या. अरविंद घोष यांचे बडोद्यातील वास्तव्य सर्वार्थाने श्रेष्ठ होते. त्यांनी १३ वर्षे बडोद्यात वास्तव्य केल्यानंतर सयाजीनगरीचा निरोप घेतला.
...

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १८