पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढे बंगालची फाळणी आणि राष्ट्रीय सभेचा स्वातंत्र्याकडे वाढलेला ओढा पाहून त्यांचे मन बडोद्यात जास्त काळ रमेना. त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण जास्तच येऊ लागली. बडोदा सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी वर्षभर बिनपगारी रजा टाकून कलकत्ता येथील राष्ट्रीय महाविद्यालयात काम सुरू केले. ते पुन्हा परत येतील असे बडोदेकरांना वाटत होते. परंतु राष्ट्रीय सभा आणि क्रांतिकारकांशी वाढलेला संपर्क यामुळे त्यांचे बडोद्यात येणे अनिश्चित झाले. त्यामुळे समस्त बडोदेकर चिंताग्रस्त बनले.
 इ.स. १९०७ मधील गाजलेले सुरत अधिवेशन संपवून अरविंद घोष बडोद्यास परतले. याच कालावधीत त्यांची महायोगी लेले यांच्याशी गाठ पडली. त्यांनी या योगीमहाराजांना आपले आध्यात्मिक गुरू मानले. ज्या बडोद्याला त्यांनी कर्मभूमीला मानले त्याच भूमीत चांदोदच्या कर्नाळी या क्षेत्री गंगानाथला त्यांना आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झाली. तत्पूर्वी त्यांनी मुजुमदारांच्या वाड्यात तीन दिवस आध्यात्मिक अनुभूतीचा सुखानुभव घेतला होता. आपले यापुढील जीवन आध्यात्मिक अनुभूतीसाठी घालवण्याचे ठरवले. क्रांतिकारक अरविंद घोष महायोगी अरविंद झाले. त्यांनी जानेवारी १९०९ मध्ये बडोदा सोडण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी स्वतः मित्रमंडळी आणि

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १७