पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अरविंद घोष यांचे बडोद्यातील मित्र
 अरविंद घोष बडोद्यास येताच पूर्वीचे मित्र केशवराव देशपांडे यांचीही भेट झाली. केशवराव देशपांडे बडोद्यास नोकरीस आले. त्यांचा राष्ट्रीय चळवळीकडे जास्त ओढा होता. त्यामुळे क्रांतिकारक खासेराव जाधव, केशवराव देशपांडे, प्रो. माणिकराव, माधवराव जाधव आणि रियासतकार सरदेसाई यांची मैत्री अल्पावधीतच झाली. यामध्ये साहित्यिक संपतराव गायकवाड यांचाही नेहमी वावर असे. साहित्य, क्रांतिकारक, देशाचे स्वातंत्र्य यावर त्यांच्या नेहमीच चर्चा होत. त्यांच्या निकट सहवासाचा अनुभव त्याकाळात अनेक नामांकित साहित्यिकांनी घेतला. यामध्ये रियासतकार सरदेसाई, खासेराव जाधव, माधवराव जाधव, राजरत्न प्रो. माणिकराव यांचा समावेश होता.

बडोद्यातील वास्तव्य

 बडोद्यात अरविंद घोष यांचे वास्तव्य १३ वर्ष होते. याकाळात त्यांनी सहा-सात ठिकाणी राहत होते. प्रथम बापूसाहेब मुजुमदार यांच्याकडे राहत होते. त्यानंतर काही काळ फतेगंज कॅप गायकवाड चाळीत राहत होते. पुढे मीर बाकर अलींचा वाडा (राव पुरा), किल्लेदार वाडा (मकरपुरा) रेसकोर्स येथील एक घर, शेवटी दांडिया बाजार मधील एक बंगला त्यांना आवडला आणि शेवटपर्यंत ते तेथेच राहिले. पुढे हा बंगला अरविंदाश्रम म्हणून राष्ट्रीय स्मारक झाले. आजही हा बंगला अरविंदाश्रम म्हणून ओळखला जातो.

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १५