पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र दत्त होते. ते पुढे १९०९ मध्ये बडोद्याचे दिवाण झाले. १९०६ मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथील दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेचे उद्‌घाटनदेखील सयाजीरावांनी के ले होते. याच परिषदेच्या महिला विभागाचे अध्यक्षपद महाराणी चिमणाबाई यांनी भूषवले होते व परिषदेतील भाषण इग्रं जीमध्ये के ले होते. या सर्व घटनांमधून राष्ट्रीय काँग्रेसच्या कामात सरुु वातीपासनू सयाजीरावांचा सहभाग टाळता न येण्याइतपत प्रभावी होता हे लक्षात येते.
 ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे निर्णायक नेतृत्व करणाऱ्या सघं टनेच्या स्थापनेपासनू आर्थिक पाठबळाबरोबर सक्रिय सहभाग घेणारे सयाजीराव भारतातील एकमेव राजे होते. इग्रं ज सरकारचा रोष पत्करण्याचे काम १८८१ ला राज्याधिकार प्राप्तीनंतर १८८३ पासनू च सयाजीराव करत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील ब्राह्मणशाहीबरोबरच इग्रं जांकडून भारतातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणाबद्दल फुल्यांनी त्यांच्या ज्या ‘शेतकऱ्याचा आसडू ’मध्ये इग्रं ज सरकारवर जहरी टीका के ली होती त्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आर्थिक साहाय्य केले.

गांधीजींना आफ्रिके तील लढ्यासाठी मदत

 १९०८ मध्ये गांधींनी दक्षिण आफ्रिके तून पत्र लिहून केलेल्या विनंतीवरून सयाजीरावांनी आफ्रिके तील भारतीय कामगारांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती व्हाईसरॉयांच्या

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / 9