Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव


आणि


महात्मा गांधी


 'भारताचा स्वातंत्र्यलढा आणि सयाजीराव' हा विषय २०१६ पर्यंत पूर्णतः दुर्लक्षित होता. बाबा भांड यांनी २०१६ मध्ये ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव' हा ग्रंथ लिहून हा विषय पहिल्यांदा चर्चेत आणला. भारतातील ५६५ संस्थानिकांमध्ये सयाजीराव हे एकटे सार्वभौम राजे होते. इंग्रजांशी मैत्रीचा करार असल्याने त्यांचा दर्जा स्वतंत्र राजाचा होता. स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाचे केंद्र बडोदा होते. या चळवळीचे सूत्रधार अरविंद घोष हे महाराजांचे खाजगी सचिव होते. बाळ गंगाधर टिळक यांना महाराजांनी पुण्यातील आपला गायकवाड वाडा इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी कागदोपत्री व्यवहार दाखवून भेट दिला होता.

 दादाभाई नौरोजी हे तर बडोद्याचे दिवाण होते. लंडनमधील इंडिया हाऊस बांधण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांना महाराजांनी आर्थिक साहाय्य केले होते. गोपाळ कृष्ण गोखले,

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / ६