पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव बेदखल
 महात्मा गांधी हे भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वात प्रभावशाली नेते मानले जातात. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महात्मा गांधी यांचा जोडून विचार करतो तेव्हा महात्मा फुल्यांप्रमाणेच महात्मा गांधीजींसाठीसुद्धा सयाजीराव गुरुस्थानी होते हे स्पष्ट होते. सयाजीरावांनी स्वातंत्र्य चळवळ असो, अस्पृश्यता निर्मूलन असो किंवा भारताचे आधुनिकीकरण असो, निर्णायक भूमिका बजावली असल्याचे अनेक पुरावे सापडतात. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात सयाजीरावांना अदृश्य ठेवण्याची किमया आपल्या इतिहासकारांनी जाणते अजाणतेपणाने केल्याने आधुनिक भारताचा खरा नकाशा आजअखेर आपण तयार करू शकलो नाही. आधुनिक भारताच्या खऱ्या नकाशात सयाजीरावांचे स्थान एखाद्या देशाच्या नकाशात जे स्थान राजधानीचे असते तसे आहे असा स्पष्ट निष्कर्ष निघतो.

●●●
महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १९