पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महालातील दालनात आले. महाराजांनी गांधींना समोरच्या आसनावर बसण्याची विनंती केली. महात्मा गांधी म्हणाले, "बापू, तुमच्यासमोर आम्ही खुर्चीवर बसणं शोभत नाही" आणि गांधी ऐने महालातील भारतीय बैठकीवर बसले. दोन्ही पाय उजव्या बाजूनं मुडपून बसायची त्यांची पद्धत होती.
 महाराजांनी महात्मा गांधींचं स्वागत केलं. अनंतराव सडेकर पवारांना महाराज म्हणाले, “सेनापती, तुम्ही बैठकीच्या दारावर थांबा. गांधीजी इथं आहेत तोपर्यंत कोणालाही लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये प्रवेश देऊ नका." अनंतराव सडेकर पवार ऐने महालातून बाहेर आले. दारातून मागे वळून बघितलं. नेहमी आपल्या खुर्चीत बसणारे महाराज महात्मा गांधींसमोर येऊन मांडी घालून बसले. अनंतरावांनी महाराजांस आपले सिंहासन सोडून असं जमिनीवर बसलेले महाराज कधीच पाहिले नव्हते. सेनापती सडेकर पवारांनी ऐने महालाचा मुख्य दरवाजा ओढून घेतला. आपला राजा महात्मा गांधींच्या समोर जमिनीवर बसला, हे दुसऱ्याने बघू नये असं सेनापतींना वाटू लागलं.”
लंडनमधील गोलमेज परिषद

 या दोन महापुरुषांची अशाच प्रकारची आणखी एक ऐतिहासिक भेट लंडनमध्ये झाली होती. १९३१ मध्ये लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेदरम्यान अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघावरून भारतीयांमध्येच प्रचंड गदारोळ माजला. यावेळी गदारोळ न करता पहिल्या परिषदेवेळचे

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १५