Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव : गांधीजींच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याची प्रेरणा
 १९१७ मध्ये गांधींनी गोध्रा येथील पहिल्या गुजराथी राजकीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेत त्यांनी शारदाबेन मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गुजराथी सामाजिक परिषद घेण्याची सूचना केली.त्यानुसार राजकीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ही सामाजिक परिषद शारदाबेन मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेवटच्या दिवशी गांधींनी गोध्रा शहरातील भंगी कॉलनीमध्ये अस्पृश्य परिषदेचे आयोजन केले. या परिषदेची ऐतिहासिकता अच्युत याग्निक आणि सुचित्रा शेठ यांनी त्यांच्या 'The Shaping of Modern Gujarat - Plurality, Hindutva and Beyond' या ग्रंथात मांडली आहे.ते म्हणतात, " And for the first time in Gujrat wealthy merchants, lawyers, traders and other elite mingled with dheds and bhangis on one platform It was a mighty gathering impossible for even the Gods to achieve and not seen by anyone in Hindusthan for centuries or rather thousands of years."

 सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्तीनंतर १८८२ पासून अस्पृश्य जातींना सरकारी खर्चाने शिक्षण उपलब्ध करून दिले. १९१३ पासून सयाजीरावांनी धारा सभेवर अस्पृश्य प्रतिनिधींच्या नियुक्तीस सुरुवात केली, तर १९१७ मध्येच त्यांनी अस्पृश्य

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / ११