पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोहरमच्या दहा दिवसात आणि बकरी ईद व रमजान ईद ऐकेक दिवस रजा देण्यात यावी. ३) गवई लोक नियमाप्रमाणे सर्व प्रकारच्या शिक्षेस पात्र आहेत. ४) गवई लोकांना नियमाप्रमाणे निवृत्तिवेतन किंवा निवृत्ती पारितोषिक देण्यात यावीत. मात्र त्यांचे वय ५५ वर्षांचे झाल्यावर त्यांना हुजूर मंजुरी शिवाय नोकरीत ठेवू नये. ५) गवई लोकांना सरकारी नोकरीत अडचण न येता अशा रीतीने कोणाकडे गाण्यास जाण्याची मोकळीक आहे. गवई लोक सरकारी कामगिरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यास त्यांना मुलकी नियमाचे धोरणाने भत्ताभाडे देण्यात यावे.
बडोदा संगीत शिक्षण आणि सुधारणा
 जानेवारी १८९५ ला महाराज परदेशातून सुखरूप परत येण्याच्या आनंदात समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभानंतर महाराजांनी आपल्या महालात इलियट, फ्रेडरिक, अब्बास तैय्यबजी, हकिम शमशुद्दीन, मौलाबक्ष खाँ, फैजमहंमद खाँ आणि त्यांचे छोटे गवई अब्दुल करीम खाँ व अब्दुल हक्क यांना बोलावून १८९६ मध्ये होणाऱ्या इंग्लंडच्या राणीच्या हीरकमहोत्सवाप्रीत्यर्थ संगीताचा काही भव्य कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराजांनी त्याकरीता वरील आठ लोकांची समिती अब्बास तैय्यबजींच्या नेतृत्वाखाली नेमली आणि याची रंगीत तालीम दसऱ्याच्या दिवशी करण्याचे योजिले.

 १८९५ ला फत्तेसिंहरावांचा तेरावा जन्मदिवस साजरा झाला. या उत्सवानिमित्त दरबारात गायन-वादन झाले. या समारंभात

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३२