पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कलावंत खात्याची अंतरव्यवस्था नियम, १९२५
 १९२५ मध्ये “कलावंत खात्याच्या अंतरव्यवस्थेसंबंधी नियम" हा ग्रंथ बडोदे सरकारी छापखान्यात छापला. कलावंत खात्याचे हे नियम वाचल्यावर आपल्याला कलासक्त सयाजीरावांच्या अथांग सुव्यवस्थापनाची ओळख होते. या खात्याचे व्यवस्थापन खूप नियमबद्ध आणि बारकाईने केले होते. गवई, वादक, नर्तकी, भांड (नकलाकार) किंवा तमाशा करणारे कलावंत या सर्वांच्या दरबार निवडीसाठी खास कायद्याचा आधार असलेल्या नियम व अटी तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील गवई नेमणूकीचे नियम पुढीलप्रमाणे,  १. तो चांगल्या घराण्यात शिकलेला असून निर्व्यसनी असावा.
 २. त्याचा आवाज मधूर असावा.
 ३. तो सशक्त असून कुरूप नसावा.
 ४. तो ख्यालिया अथवा धूपदिया असावा.
 ५. त्याला गायनाची शास्त्रीय माहिती असून सदरहूचे सांकेतिक लेखनही अवगत असावे.
 ६. त्यास रागांचे गायन व व्यावहारिक गायनही येत असावे.
 ७. त्यास उभे राहूनही गाता यावे.

याशिवाय सर्व दरबारी गवयांसाठी काही विशिष्ट नियमही करण्यात आले होते. त्यामध्ये, १) गवई लोकांना गाण्याच्या वेळी तबला आणि जरूरीप्रमाणे तंबोऱ्याची आणि सारंगीवाल्याची साथ सरकारांकडून देण्यात यावी. २) मुसलमान गवयांस

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३१