Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



देण्याची इच्छा व्यक्त केली. या दोघांनी नम्रपणे ती स्वीकारली. येथे महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. हेच अब्दुल करीम खाँ पुढे जगप्रसिद्ध गायक बनले.
 दरबारी नोकरीत रूजू होताच त्यांना जनानखान्यातील गाण्याची आवड असलेल्या स्त्रियांना गाणे शिकवायला जावे लागे. शिवाय दरबारात गायनही करावे लागे. हे काम एकट्या अब्दुल करीम खाँना करावे लागे.

मैफिलीत मात्र दोघे

जनानखान्यातून असत. या दोघांची आणि त्यांच्या गाण्याची तारीफ महाराजांच्या कानावर गेली होती. त्यामुळे लवकरच या दोघांचे गाणे खासगीत दिवाणखान्यात
महाराजांसमोर झाले. या दोघा बंधूंनी आळीपाळीने गायन करून मैफील गाजविली. महाराजांनी खुश होऊन त्यांना बक्षीस म्हणून पाचशे रूपये, भरजरी शाल आणि अब्दुल हक्कला भरजरी टोपी दिली.
 महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १६